आले पीक लागवड पद्धत – कोठारी ड्रीप इरिगेशन सिस्टीमद्वारे रासायनिक खत व पाणी व्यवस्थापन
Date: 27-1-2021
जैविक प्रक्रिया : सेंद्रिय आले लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी -
चुना 3 किलो 100 लिटर पाण्यात भिजवून सदर द्रावणात बियाणे 15 मिनीटे बुडवून सावलीत वाळवून लागवड करावी.
अथवा
एक महिना जुने गोमुत्र 2 ते 3 लिटर, दुभत्या गाईचे ताजे शेण (3 ते 5 तासातले) दोन ओंजळ, गुळ 200 ग्रॅम 100 लिटर पाण्यात मिसळून द्रावण बनवावे. या द्रावणात बेणे 15 ते 20 मिनीटे बुडवून सावलीत वाळवून लागवड करावी.
लागवड पध्दत : कोठारी ड्रीप इरिगेशनवर लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी पारंपारिक सपाट वाफे पध्दत किंवा सरी वरंबा पध्दतीने लागवड न करता रुंद वरंबा किंवा गादी वाफा पध्दतीनेच लागवड करावी. या पध्दतीमुळे एकरी उत्पादनात वाढ होते. अति पावसात पाणी शेतात साचू नये म्हणून चारी काढून पाणी काढण्याची व्यवस्था लागवडीच्या वेळीच करुन ठेवावी.
रुंद वरंबा किंवा गादी वाफा पध्दत : गादी वाफ्यासाठी 150 सेमीवर चारी मारून घ्यावी. माथा 90 सेमी व बेडची उंची 30 सेमी ठेवावी. बेडचा पाया 120 सेमी व दोन गादी वाफ्यांच्या मधील अंतर (नाली) 30 सेमीची ठेवावी. याप्रमाणे कोठारी ड्रीपचे लॅटरल 150 सेमीवर अंथरावेत. अंतर जास्तीत जास्त 180 सेमीपर्यंत ठेवता येईल.
गादी वाफा पध्दतीवर कोठारी ड्रीप इरिगेशनने गादी वाफे भीजवून घेऊन वाफशावर प्रक्रिया केलेल्या आल्याची लागवड करावी. वाफ्याच्या माथ्यावर लागवड करताना जोड ओळ पध्दतीने लागवड करताना ओळीतील अंतर 60 सेमी व एका ओळीतील दोन बीजातील अंतर 22 ते 25 सेमी ठेवावे. (बियाणे निवडताना मुख्य मात्रा कंदाचे वजन 25 ते 55 ग्रॅम असावे. बीजकंदाचे वजन 2.5 ते 5 ग्रॅम असावे. एकरी साधारण 600 ते 800 किलो बियाणे लागते.) लागवड करताना कंद 4 ते 5 सेमी खोल लावावे.
तणनाशक : मशागतीच्या वेळी बहुवार्षिक तणांचे कंद, काश वेचून काढावेत. तणाचा त्रास असल्यास लागवडीनंतर दुसऱ्या - तिसऱ्या दिवशी अॅट्राझिन 4 ग्रॅम/ लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करुन घ्यावी. उगवणीनंतर शक्यतो तणनाशक फवारणी करु नये. पीक वाढीवर परिणाम होतो.
रासायनिक खत व्यवस्थापन : आले पीकाला प्रमुख अन्नघटकांत नत्र 120 किलो, स्फुरद 75 किलो व पालाश 75 किलो / हेक्टर शिफारस करण्यात आलेली आहे. दुय्यम अन्नघटकांत मॅग्नेशियम सल्फेट विद्राव्य व द्रवरुप गंधक खतांचा वापर करावा. युरिया खतांसोबत गंधक द्रवरुपाचा वापर करावा. पीकांच्या वाढीसाठी व रोग प्रतिकारकशक्ती वाढीचा फायदा होतो. सुक्ष्म अन्नघटकांत फेरस सल्फेट(8-10 किलो), झिंक सल्फेट (3-5 किलो), मँगेनीज सल्फेट (2-3 किलो), कॉपर सल्फेट (1-2 किलो), बोरॉन (2-3 किलो), प्रती एकरी विद्राव्य खते कोठारी ड्रीप इरिगेशनच्या माध्यमातून द्यावेत. माती परिक्षणानंतर उपलब्ध अन्नघटकांनुसार रासायनिक खतांचे व्यवस्थापन केल्यास योग्य प्रमाणात व वेळेत खत व्यवस्थापनातून उत्पादनांचे उद्दीष्ट कमी खर्चात गाठणे शक्य आहे. योग्य अन्नघटकांचे नियोजनामुळे पीकांची वाढ परिपूर्ण होते तसेच रोग-किड प्रतिकारकशक्ती वाढून यावरील फवारण्यांचा खर्च कमी होतो. म्हणून कोठारी ड्रीप इरिगेशनच्याद्वारेच रासायनिक खतांचे नियोजन करावे. पीकांचे वार्षिक खत व्यवस्थापनासाठी आले उत्पादक शेतकऱ्यांनी कोठारी ॲग्रीटेक प्रा. लि. च्या ॲग्रोनॉमी विभागाशी संपर्क करुन वार्षिक खत व्यवस्थापनाचे नियोजन घ्यावे आपले एकरी उत्पादन वाढवावे.
पाणी व्यवस्थापन : एकरी खर्च कमी व उत्पादन वाढीसाठी कोठारी ड्रीप इरिगेशन हे सर्वात उत्तम पर्याय आहे. पाण्याचे नियोजन म्हणजे खताचे नियोजन कोठारी ड्रीप इरिगेशनचे फायदे - पीकांच्या गरजेनुसार पाणी म्हणजे
- पाण्याच्या प्रत्येक थेंबावर नियंत्रण म्हणजे पूर्ण क्षेत्रावर नियंत्रण.
- मुळांच्या कक्षेस कायम वाफसा राहिल्याने उपयुक्त जिवाणूंची संख्येत मोठी वाढ. यामुळे अन्नघटकांची उपलब्धता वाढते.
- रासानिक खते मुळांच्या कक्षेतच दिले गेल्यामुळे खतांच्या खर्चात 30-40% पर्यंत बचत होते व उपलब्धता 80% पेक्षा अधिक राहते. वरुन फेकून टाकलेल्या खतांची उपलब्धता फक्त 30% पर्यंतच राहते व वरच्या थरात खते पडून राहिल्याने वाया जातात व गवत वाढीसाठी कारणीभूत ठरतात.
- कमी वेळेत पूर्ण क्षेत्र भिजवता येते. म्हणजे उपलब्ध पाण्याचा पूर्ण क्षमतेने वापर होतो. पाण्याची 50-60% पर्यंत बचत होते.
- मजूरीत बचत, विद्युत बचत, खतांच्या खर्चात बचत तसेच किटक-बुरशी नाशकाच्या खर्चात बचत. नियंत्रित क्षेत्रावर पाणी दिले गेल्यामुळे तण नियंत्रणात राहते त्यामुळे तणाच्या खर्चात बचत होते.
जमिनीच्या प्रकारानुसार कोठारी इनलाईन ड्रीपची निवड करावी.
- हलक्या प्रकारच्या जमीनीला जलधारण क्षमता कमी व निचरा जास्त असल्याने ड्रीपरमधील अंतर 30 सेमी, लॅटरल (नळीची गोलाई) 16 एमएम ची व ड्रीपरचा डिस्चार्ज 1.2 ते 2 लिटर/तास असावा.
- मध्यम प्रकारची जमीन : जलधारण क्षमता मध्यम व निचरासुध्दा मध्यम असतो. अशा प्रकारच्या मातीच्या जमिनीला कोठारी इनलाईन ड्रीप 16 एमएम / 20 एमएम ची ड्रीपरमधील अंतर 40 सेमी व ड्रीपरचा डिस्चार्ज (पाण्याचा प्रवाह) 2 लिटर / तास असावा.
- भारी प्रकारची जमीन : जलधारण क्षमता जास्त व निचरा कमी असतो. अशा प्रकारच्या मातीच्या जमिनीला कोठारी इनलाईन ड्रीप 16 एमएम / 20 एमएम ची (गोलाई) ड्रीपरमधील अंतर 50 ते 60 सेमी व ड्रीपरचा डिस्चार्ज (पाण्याचा प्रवाह) 2 लिटर / तास असावा. या प्रकारच्या जमिनीचे पाणी नियोजन अत्यंत काटेकोर पध्दतीने केल्यास त्याचा उपयोग उत्पादन वाढीसाठी होतो.
आज कोठारी ड्रीप इरिगेशनचे तंत्रज्ञान विकसित झालेले असून, याचा वापर योग्य पध्दतीने केल्यास कमी खर्चात भरघोस उत्पादनाचे उद्दीष्ठ गाठून दर्जेदार मालाला चांगला बाजार भाव मिळवून आर्थिक फायदा वाढविण्यासाठी आले उत्पादक शेतकऱ्यांची कोठारी अॅग्रीटेक प्रा. लि. च्या इंजिनीअरच्या मदतीने आपल्याकडील उपलब्ध पाणी व त्याच्या प्रतीनुसार तसेच जमिनीच्या प्रकारानुसार योग्य त्या कोठारी ड्रीपची निवड करण्यासाठी संपर्क करुन हे अत्याधुनिक सिस्टीम आजच आपल्या शेतात बसवावे. तसेच मशागतीपासून ते वाढणीपर्यंतचे पीक व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनासाठी ॲग्रोनॉमी विभागाला संपर्क करावे. अधिक माहितीसाठी संपर्क :
श्री. विजकुमार सरुर,
एम.एस्सी. अॅग्रोकेमिकल्स,
चिफ-अॅग्रोनॉमिस्ट, कोठारी अॅग्रीटेक प्रा. लि. संपर्क : 9545552988