आले पीक आंतरमशागत आणि कीड व रोग नियंत्रण | Kothari Group

आले पीक आंतरमशागत आणि कीड व रोग नियंत्रण

Date: 16-6-2021

आंतरमशागत : पारंपारिक पध्दतीने लांब दांड्याच्या खुरप्याने उटाळणी म्हणजे खोलपर्यंत खुरप्याने माती ढिली करुन मुळ्या तोडल्या जातात. खुरपण करुन तण नियंत्रणात ठेवावे पण मुळ्या तोडून मुळांना व कंदाला इजा करु नये. कारण इजा झाल्याने मातीतील अपायकारक जीवाणू जसे मर रोगाची बुरशी फ्युजारियम, पायथियम तसेच निमॅटोड सहज या इजा झालेल्या मुळ्यांतून आत शिरतात व मर रोग व कंद कूज या रोगाला बळी पडतात.

कोठारी ड्रीप इरिगेशनवर आले पीक करत असल्याने गादी वाफ्यात वाफशापेक्षा जास्त पाणी देऊ नये पाण्यावर नियंत्रण ठेवल्याने जमीन भुसभुसीत राहते. कंद वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते. त्यामुळे खोल उटाळणी करु नये. खुरपण झाल्यावर कोठारी ड्रीप इरिगेशनद्वारे जैविक खते, अ‍ॅझोटोबॅक्टर, पी.एस.बी. ट्रायकोडर्मा सोडावे. अपाकारक जीवाणूंपासून मुळ्यांचे संरक्षण होते. तसेच जीवामृत व्यवस्थित गाळून कोठारी ड्रीप इरिगेशनद्वारे सोडावे.

कीड व रोग नियंत्रण :

कंदमाशी : दिसायला डासाप्रमाणे पण थोडीशी मोठी असते. मादी कंदावर जवळपास अंडी घालते. अंड्यातून अळी बाहेर पडून कंदाध्ये शिरते व आतून कंद खाते.

नियंत्रण : जुलै - ऑगस्ट महिन्यात क्विनॉलफॉस (25%) 2 मिली/लिटर पाणी अथवा डायमिथोयेट 1.5 मिली/लिटर पाणी अथवा क्लोरोपायटीफॉस 2 मिली/लिटर पाणी याची आलटून पालटून दर 12-15 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. दशपर्णी अर्क 8 ते 10 मिली/लिटर पाणी फवारणी करावी.

खोड पोखरणारी अळी :अळी खोडाला बारिक छिद्र करुन आत शिरते व आतून खोड खाऊन उपजिवीका करते. प्रथम पान पिवळे पडून नंतर वाळते. जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत प्रादुर्भाव दिसून येतो.

नियंत्रण : मॅलेथिऑन 1 ते 1.5 मिली/लिटर पाणी या प्रमाणात महिन्यातून एकदा फवारणी करावी.

पाने गुंडाळणारी अळी : अळी अंड्यातून बाहेर पडून आल्याचे पान स्वतःभोवती गुंडाळी करुन घेते व आतून पान खाऊन उपजिवीका करते. अळी हिरव्या रंगाची असून ऑक्टोबर व डिसेंबर मध्ये प्रादुर्भाव दिसून येतो.

नियंत्रण : कार्बारिल 1 मिली/लिटर पाणी अथवा डायमिथोयेट 0.5 ते 1 मिली/लिटर पाणी प्रमाणात फवारणी करावी. दशपर्णी अर्क 5 ते 8 मिली/लिटर पाणी अथवा लिंबोळी अर्काची फवारणी करावी.

तुडतुडे : पानांच्या खालील बाजूने रसशोषणचे काम करतात. पानांच्या मधून गोड रस बाहेर पडून पानांवर साचतो. त्यावर तांबेरासारखी बुरशी वाढून उत्पादनात घट होते.

नियंत्रण : बांधाचेसुध्दा गवत स्वच्छ करावे. क्विनॉल फॉस 1 ते 2 मिली/लिटर पाणी प्रमाणात फवारणी करावी.

सुत्रकृमी : मुळातील रसशोषणातून उपजीविका करतात. कंदाच्यावरील भागात वाढून कंदाचा वरचा पदर कुजतो त्यातून मर रोगाची बुरशी शिरुन कंद कूज वाढते.

नियंत्रण : आंतरपीक दर पाच फुटाला झेंडू लावावे. रासानिक बीजप्रकिया करुनच लागवड करावी. झेंडुच्या फुलांचा अर्क 500 मिली/एकर या प्रमाणात कोठारी ड्रीपमधुन सोडावे. 3 ते 4 महिन्यांचे जुने गोमुत्र 2 ते 5 लिटर/एकर या प्रमाणात कोठारी ड्रीपमधुन सोडावे.

रोग नियंत्रण :

कंदकुज : लक्षणे - पाने पिवळे पडून शेंडा व कडा करपतात. कंद काळपट पडतात. हा रोग सुत्रकृमी, खुरपण व आंतर मशागतीमुळे मुळांना इजा झालेल्या जागेतून पिथियम व फ्युजारिअम बुरशी कंदात शिरते व कंदाचा गड्डा कुजू लागतो.त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होते.

नियंत्रण : चारी खणून पाणी बाहेर जाण्याची व्यवस्था करणे. लागवडीला रासानिक बीज प्रकिया करावी. खुरपण करताना मुळ्या तोडु नये. गंधक खतांचा वापर करावा.

पानावरील ठिपके : पानांवर असंख्य पिवळसर पांढरे ठिपके पडतात.

नियंत्रण : कोवळ्या पानावर प्राथमिक दर्शनी ठिपके दिसताच मॅंकोझेब 2 ते 3 ग्रॅम/लिटर पाणी अथवा कार्बेन्डाझिम 1 ते 1.5 ग्रॅम/लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करुन घ्यावी. रोग कीडीचा प्राधुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी लागवडीपासून पाणी कोठारी ड्रीप इरिगेशनद्वारे नियंत्रित व वेळेत खत व्यवस्थापन करावे.

आज कोठारी ड्रीप इरिगेशनचे तंत्रज्ञान विकसित झालेले असून, याचा वापर योग्य पध्दतीने केल्यास कमी खर्चात भरघोस उत्पादनाचे उद्दीष्ठ गाठून दर्जेदार मालाला चांगला बाजार भाव मिळवून आर्थिक फायदा वाढविण्यासाठी आले उत्पादक शेतकऱ्यांची कोठारी अ‍ॅग्रीटेक प्रा. लि. च्या इंजिनीअरच्या मदतीने आपल्याकडील उपलब्ध पाणी व त्याच्या प्रतीनुसार तसेच जमिनीच्या प्रकारानुसार योग्य त्या कोठारी ड्रीपची निवड करण्यासाठी संपर्क करुन हे अत्याधुनिक सिस्टीम आजच आपल्या शेतात बसवावे. तसेच मशागतीपासून ते वाढणीपर्यंतचे पीक व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनासाठी ॲग्रोनॉमी विभागाला संपर्क करावे. अधिक माहितीसाठी संपर्क :

श्री. विजकुमार सरुर,
एम.एस्सी. अ‍ॅग्रोकेमिकल्स,
चिफ-अ‍ॅग्रोनॉमिस्ट, कोठारी अ‍ॅग्रीटेक प्रा. लि. संपर्क : 9545552988