CSR | Kothari Group India

Swachha Bharat Abhiyan-2 Oct 2017

Swachha Bharat Abhiyan-2 Oct 2017

Blood Camp 2018

Kothari Group India

Blood Camp 2018

Health check up Camp 2018

Health Check Up Camp 2018

Tree Plantation 2nd Oct 2018

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त कोठारी ग्रुपतर्फे महावृक्षारोपण व स्वच्छता अभियान उपक्रम

गेल्या 22 वर्षांपासून चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीमधील कोठारी ग्रुप विविध प्रकारचे शेतीपूरक उत्पादने एकाच छताखाली निर्मिती करणारा देशातील अग्रगण्य ग्रुप आहे. व्यवसाय करीत असताना त्यांच्या वरिष्ठ प्रशासनाची जनमानसांशी व समाजाशी नाळ बांधली गेली असल्याने सामाजिक अस्मिता जपणे, हे कोठारी ग्रुपचे परम कर्तव्य आहे. म्हणूनच समाजहितासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवून आपला वेगळा ठसा कोठारी ग्रुप सतत उमटवित आलेला आहे. भारत सरकारच्या ”स्वच्छ भारत अभियाना” अंतर्गत कोठारी ग्रुपने दिनांक 2 ऑक्टोबर 2018 रोजी महावृक्षारोपण” व चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीत ”स्वच्छता अभियानाचा” कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार श्री. राजनजी पाटील तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधिक्षक श्री. मनोजजी पाटील, सन्माननीय पाहुणे म्हणून चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन श्री. कौशिकतात्या गायकवाड व प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. अजिंक्य राउत तसेच कोठारी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री. किरण कोठारी, सहसंस्थापक व विद्यमान अध्यक्ष श्री. अरविंद कोठारी, सहसंस्थापक व कार्यकारी संचालक श्री. उज्वल कोठारी, सहसंस्थापक व संचालक - पाईप विभाग श्री. अमोल पालीया हे मंचावर उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरूवात तुळशी या पवित्र वृक्षाच्या पूजनाने झाली. त्यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांचा कोठारी ग्रुपच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन पारंपारिकपणे सत्कार करण्यात आला. त्यानंतर कोठारी ग्रुपच्या इरिगेशन विभागाचे संचालक श्री. पुष्कराज कोठारी यांनी प्रास्ताविक सादर करून कोठारी ग्रुपची थोडक्यात माहिती विशद करून कार्यक्रमाचा उद्देेश व वृक्षारोपणाचे महत्व सांगून कोठारी ग्रुपचा विविध सामाजिक उपक्रमात असलेला सहभाग सविस्तरपणे सांगितला. वृक्षारोपणासाठी 15 विविध प्रकारची औषधी वनस्पती तसेच विविध फळझाडे व फुलझाडे प्रामुख्याने लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी लागवड केलेल्या सर्व वृक्षांच्या संगोपनाची व संवंर्धनाची जबाबदारी ही कोठारी ग्रुपनेच स्वीकारली असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. आपल्या सर्वांच्या साथीने कोठारी ग्रुपच्या उत्पादनांनी संपूर्ण भारतात तर आपला ठसा उमटविलेलाच आहे. परंतु आता सातासमुद्रापारदेखील कोठारी उत्पादने आपली स्वतंत्र ओळख सिद्ध करीत आहेत, असेच आपले सहकार्य सदैव राहील, यात प्रशासनास यत्किंचीतही शंका नाही.

अशीच रोजगार वृद्धी आपल्या उद्योेग समूहाच्या माध्यमातून होत राहो व समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची पूर्ती अखंड होत राहील, असे मनोगत त्यांनी आपल्या प्रस्तावनेतून व्यक्त केले आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. मनोजजी पाटील यांनी चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीस पोलिस प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल व उद्योगवाढीसाठी योग्य ते संरक्षण देण्याची ग्वाही यावेळी बोलताना दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. राजनजी पाटील यांनी उपस्थित सर्वांचे मार्गदर्शनपर केलेल्या आपल्या भाषणात कोठारी ग्रुपसोबत त्यांचे घनिष्ट व जिव्हाळयाचे संबंध हे सुरूवातीपासूनच आहेत, असे सांगितले तसेच त्यांनी आपल्या भाषणात अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि कोठारी ग्रुपतर्फे दरवर्षी राबविण्यात येत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर उपस्थित सर्वांनी वृक्षलागवड आणि संवर्धनाची व स्वच्छतेची शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रमोद कोरे सर यांनी केले तर श्री. आशिष कोठारी यांनी सर्वांचे आभार मानले व आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाला सुरूवात झाली. कार्यक्रमास कोठारी ग्रुपच्या युवापिढीतील नेतृत्व करणारे सर्व संचालक मंडळ श्री. पुष्कराज कोठारी, श्री. आशिष कोठारी, श्री. अक्षय कोठारी, श्री. सौरभ कोठारी, श्री. गौरव कोठारी व श्री. योगेश शहा आवर्जून उपस्थित होते. तसेच कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पी. चव्हाण हे देखील उपस्थित होते.

यावेळी कोठारी ग्रुपच्या वतीने चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीतील सर्व प्रमुख रस्त्यांच्या कडेला झाडे लावण्यात आली व त्यानंतर वसाहतीमध्येच स्वच्छता अभियानास सुरूवात झाली. आपल्या उत्पादन विभागाच्या सभोवतालचा संपूर्ण परिसर कोठारी ग्रुपच्या सर्व 6 युनिट्स मधील जवळ-जवळ 650 पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी एकत्रितरीत्या स्वच्छ केला. या कार्यक्रमानंतर चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीचा चेहरामोहराच बदलल्याचे चित्र दिसू लागले आहे. सर्व स्वयंसेवकांजवळ कार्यक्रमासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींची पूर्तता कोठारी ग्रुपच्या प्रशासनाने आधीच करून ठेवलेली असल्याने कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला.यावेळी कोठारी ग‘ुपच्या वतीने चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीतील सर्व प्रमुख रस्त्यांच्या कडेला झाडे लावण्यात आली व त्यानंतर वसाहतीमध्येच स्वच्छता अभियानास सुरूवात झाली. आपल्या उत्पादन विभागाच्या सभोवतालचा संपूर्ण परिसर कोठारी ग‘ुपच्या सर्व 6 युनिट्स मधील जवळ-जवळ 650 पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी एकत्रितरीत्या स्वच्छ केला. या कार्यक‘मानंतर चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीचा चेहरामोहराच बदलल्याचे चित्र दिसू लागले आहे. सर्व स्वयंसेवकांजवळ कार्यक‘मासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टींची पुर्तता कोठारी ग‘ुपचे प्रशासनाने आधीच करून ठेवलेली असल्याने कार्यक‘म निर्विघ्नपणे पार पडला.

Blood Donation Camp 2019

कोठारी ग्रुपतर्फे 19 व्या महारक्तदान शिबीराचे आयोजन

आपला उद्योग व्यवसाय सांभाळत सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी, समाजाप्रती असलेल्या कर्तव्यपूर्तीसाठी तत्पर तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सदैव अग्रेसर राहणाऱ्या सोलापूर स्थित कोठारी ग्रुपच्या वतीने व सिद्धेश्वर ब्लड बँक यांच्या सहकार्याने ग्रुपचे संचालक श्री. अमोल पालिया यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून सालाबादाप्रमाणे यावर्षीसुद्धा दिनांक 27 मार्च रोजी महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

आपला उद्योग व्यवसाय सांभाळत सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी, समाजाप्रती असलेल्या कर्तव्यपूर्तीसाठी तत्पर तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सदैव अग्रेसर राहणाऱ्या सोलापूर स्थित कोठारी ग्रुपच्या वतीने व सिद्धेश्वर ब्लड बँक यांच्या सहकार्याने ग्रुपचे संचालक श्री. अमोल पालिया यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून सालाबादाप्रमाणे यावर्षीसुद्धा दिनांक 27 मार्च रोजी महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. महारक्तदान शिबीराचे उद्घाटन मोहोळ नागरी पतसंस्थेचे तसेच चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन मा. श्री. कौशिकतात्या गायकवाड यांच्या हस्ते सकाळी 10.30 वाजता कोठारी ग्रुपच्या चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीमधील ऑफीसमध्ये करण्यात आले. यावेळी चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीचे व्हाईस चेअरमन श्री. प्रसाद गुरव, कोठारी ग्रुपचे संस्थापक चेअरमन श्री. किरण कोठारी, विद्यमान चेअरमन श्री. अरविंद कोठारी, तसेच संचालक मंडळातील श्री. अमोल पालिया व श्री. आशिष कोठारी उपस्थित होते. आपल्या उद्घाटनपर केलेल्या भाषणांत मा. श्री. कौशिकतात्या यांनी सर्वप्रथम श्री. अमोल पालिया यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व त्यानिमित्ताने कोठारी ग्रुपतर्फे दरवर्षी होत असलेल्या रक्तदान शिबिरासारख्या स्तुत्य उपक्रमाबद्दल कोठारी ग्रुपला धन्यवाद दिले व अशाच प्रकारे कोठारी ग्रुपची भरभराट होत राहो आणि कोठारी ग्रुपच्या माध्यमातून असेच सामाजिक कार्य अखंड सुरू राहो, या शुभेच्छाही त्यांनी यावेळी कोठारी ग्रुपला दिल्या. यावेळी सिद्धेश्वर ब्लडबँकेतर्फे श्री. कौशिकतात्या गायकवाड, कोठारी ग्रुपचे चेअरमन श्री. अरविंद कोठारी व संचालक श्री. अमोल पालिया या सर्वांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

सलग 19 वर्षांपासूनची कोठारी ग्रुपची दिनांक 27 मार्च रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्याची परंपरा असून यावर्षीसुद्धा सकाळी दहा वाजल्यापासूनच रक्तदाते रक्तदानासाठी नाव नोंदणी व पुढील कार्यवाही करणेसाठी ऑफिस परिसरात गर्दी करून होते. रक्तदात्यांमध्ये झालेली जागृती व सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची तळमळ यामूळे यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा जास्त रक्त संकलनाची अपेक्षा असल्यामूळे सिद्धेश्वर ब्लड बँकेकडून 15 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती याठिकाणी करण्यात आली होती. केवळ कोठारी ग्रुपमधीलच नाही तर संपूर्ण चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीमधील सर्व कंपन्यांमधून सर्वसामान्य रक्तदात्यांनी रक्तदान करून या सामाजिक उपक्रमात आपला खारीचा वाटा उचलून आपले योगदान दिले. या रक्तदान शिबीरामध्ये कोठारी ग्रुपचे चेअरमन श्री अरविंद कोठारी, संचालक श्री. आशिष कोठारी यांच्या सह सर्व अधिकाऱ्यांनी रक्तदान केले तसेच समस्त कर्मचारी व कामगार वर्गातून या रक्तदान शिबीरास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 222 युनिट्स रक्त संकलन झाले त्याबद्दल सिद्धेश्वर ब्लड बँकेतर्फे श्री. योगेश कवेकर यांनी कोठारी ग्रुपचे वरिष्ठ प्रशासन व सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

मोहोळ ग्राम स्वच्छता अभियान 2019

मोहोळ ग्राम स्वच्छता अभियान

गेल्या 22 वर्षांपासून चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीमधील कोठारी ग्रुप विविध प्रकारच्या 25 पेक्षा अधिक शेतीपूरक उत्पादनांची एकाच छताखाली निर्मिती करणारा देशातील अग्रगण्य ग्रुप आहे. आपला उद्योग व्यवसाय सांभाळत सामाजिक बांधिलकी जपून समाजाचे ॠण फेडण्यासाठी कोठारी ग्रुपचे वरिष्ठ व्यवस्थापन सदैव तत्पर असते. याच उदात्त हेतूने कोठारी ग्रुपच्या वतीने दिनांक 2 ऑक्टोबर 2019 रोजी ...

गेल्या 22 वर्षांपासून चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीमधील कोठारी ग्रुप विविध प्रकारच्या 25 पेक्षा अधिक शेतीपूरक उत्पादनांची एकाच छताखाली निर्मिती करणारा देशातील अग्रगण्य ग्रुप आहे. आपला उद्योग व्यवसाय सांभाळत सामाजिक बांधिलकी जपून समाजाचे ॠण फेडण्यासाठी कोठारी ग्रुपचे वरिष्ठ व्यवस्थापन सदैव तत्पर असते. याच उदात्त हेतूने कोठारी ग्रुपच्या वतीने दिनांक 2 ऑक्टोबर 2019 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त ‘‘मोहोळ ग्राम स्वच्छता अभियानाचा’’ तसेच विधी सेवा समिती व विधिज्ञ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विधी साक्षरता शिबिरांतर्गत ‘‘बेटी बचाओ बेटी पढाओ’’ या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात मोहोळ शहरातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये मान्यवरांच्या हस्ते गांधी प्रतिमेच्या पूजनानंतर त्या ठिकाणी वृक्षारोपणाने झाली व निवड केलेल्या सर्व ठिकाणांवर कोठारी ग्रुपच्या 800 स्वयंसेवकांनी संपूर्ण मोहोळ शहरात स्वच्छता अभियानास सुरूवात केली. कार्यक्रमाच्या सांगता समारोहामध्ये स्वच्छता शपथ श्री. कदम यांनी दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मोहोळ दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश श्री. आर. एन. गायकवाड व न्यायाधीश श्री. कुलकर्णी तसेच प्रमुख पाहूणे म्हणून पंचायत समिती मोहोळचे गटविकास अधिकारी श्री. अजिंक्य येळे, गटशिक्षणाधिकारी श्री. सिद्धेश्वर निंबर्गी, मोहोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. सूर्यकांत कोकणे, सन्माननीय पाहुणे म्हणून मोहोळ नागरी पतसंस्था व चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन डॉ. श्री. कौशिकतात्या गायकवाड, मोहोळ ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्री. चेतन आयवळे, म.रा.वि.म. सहायक अभियंता श्री. चव्हाण, वाहतूक नियंत्रक मोहोळ श्री. सुनिल साठे तसेच व्यासपीठावर विशेष उपस्थितांमध्ये कोठारी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री. किरण कोठारी, विद्यमान अध्यक्ष श्री. अरविंद कोठारी, कार्यकारी संचालक श्री. उज्वल कोठारी व संचालक श्री. अमोल पालिया हे मंचावर उपस्थित होते.

आलेल्या सर्व मान्यवरांचे तुळशी वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर कोठारी ग्रुपचे ईरिगेशन विभागाचे संचालक श्री. पुष्कराज कोठारी यांनी प्रास्ताविक सादर करून कोठारी ग्रुपची थोडक्यात माहिती विशद केली व कार्यक्रमाचा उद्देष सांगून कोठारी ग्रुपचा विविध सामाजिक उपक्रमात असलेला सहभाग सविस्तरपणे सांगितला. त्यानंतर सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. अजिंक्य येळे व श्री. सूर्यकांत कोकणे यांनी आपल्या मार्गदर्शनपर संबोधनात स्वच्छतेचे महत्व विशद केले व कोठारी ग्रुपच्या या उपक्रमाचे कौतुक करीत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच श्री. सिद्धेश्वर निंबर्गी यांनी सर्वांना यावेळी मतदानाची शपथ दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. आर. एन. गायकवाड यांनी विधी व न्याय विभागाच्या बेटी बचाव, बेटी पढावो उपक्रमाचे महत्व व समाजामध्ये महिलांची सद्यपरिस्थितीत असलेली उपयुक्तता विशद करून या अभियानामध्ये योगदान देण्याचे आवाहन केले. तसेच कोठारी ग्रुपच्या या स्तुत्य उपक्रमाची प्रशंसा केली व शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रमोद कोरे सर यांनी केले तर श्री. आशिष कोठारी यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमास कोठारी ग्रुपच्या युवा पिढीतील नेतृत्व करणारे सर्व संचालक मंडळ श्री. अक्षय कोठारी, श्री. सौरभ कोठारी, श्री. गौरव कोठारी व श्री. योगेश शहा हे आवर्जून उपस्थित होते. यावेळी कोठारी ग्रुपच्या मानव संसाधन टीम व सर्व 6 युनिट्सच्या जवळ-जवळ 800 च्या वर स्वयंसेवकांनी एकत्रितरीत्या स्वच्छता अभियानामध्ये आपले योगदान दिले.

कोठारी ग्रुपच्या कर्मचारी व व्यवस्थापनातर्फे पी.एम. केअर्स फंड व चिफ मिनीस्टर्स रिलीफ फंड -कोवीड 19 मध्ये 15 लाखांची मदत

Kothari Group India

कोठारी ग्रुपच्या कर्मचारी व व्यवस्थापनातर्फे पी.एम. केअर्स फंड व चिफ मिनीस्टर्स रिलीफ फंड -कोवीड 19 मध्ये 15 लाखांची मदत

गेल्या 23 वर्षांपासून चंद्रमौळी औद्योगीक वसाहतीमधील कोठारी ग्रुप विविध प्रकारच्या 25 पेक्षा अधिक शेतीपूरक उत्पादनांची एकाच छताखाली निर्मिती करणारा देशातील अग्रगण्य ग्रुप आहे. आपला उद्योग व्यवसाय सांभाळत सामाजिक बांधिलकी जपून समाजाचे ॠण फेडण्यासाठी कोठारी ग्रुपचे वरिष्ठ व्यवस्थापन सदैव तत्पर असते.

गेल्या 23 वर्षांपासून चंद्रमौळी औद्योगीक वसाहतीमधील कोठारी ग्रुप विविध प्रकारच्या 25 पेक्षा अधिक शेतीपूरक उत्पादनांची एकाच छताखाली निर्मिती करणारा देशातील अग्रगण्य ग्रुप आहे. आपला उद्योग व्यवसाय सांभाळत सामाजिक बांधिलकी जपून समाजाचे ॠण फेडण्यासाठी कोठारी ग्रुपचे वरिष्ठ व्यवस्थापन सदैव तत्पर असते. सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाने संपूर्ण देशात थैमान घातले असून बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, ही चिंतेची बाब असतांना आपल्या सर्व सरकारी यंत्रणा या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी रात्रंदिवस सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेतच, त्यांच्या या निस्वार्थ देशभक्तीला मनापासून सलाम.

दिनांक 23 मार्च पासून सरकारने संपूर्ण देशात लॉकडाउन करण्याचे निर्देश दिल्यानंतर कोठारी ग्रुपने देखील त्वरीत आपली सर्व उत्पादन युनिट्स बंद ठेवून या सार्वजनिक आवाहनास सहयोग देत पाठिंबा दिला. या आणीबाणीच्या परिस्थितीत समाजातील दुर्बल घटक जे या लॉकडाउनच्या काळात आवश्यक त्या अन्नधान्यांची साठवणूक करू शकले नाहीत किंवा उपलब्ध होऊ शकले नाहीत अशा गरजू समाजबांधवांसाठी कोठारी ग्रुपच्या वतीने 200 फूड पॅकेट्सचे वितरण मोहोळ शहरात करण्यात आले.

या वैश्विक महामारीचा सामना करण्यासाठी आपले सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे व यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर अतिरिक्त भार निश्चितच पडत आहे, यासाठी मा. पंतप्रधानांनी सर्व जनतेस इच्छेनुरूप आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले व याही वेळेस विविध सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या कोठारी ग्रुपने सामाजिक बांधिलकी म्हणून आपला खारीचा वाटा उचलत पी. एम. केअर्स फंड व चिफ मिनीस्टर्स रिलीफ फंड -कोवीड 19 मध्ये एकूण रक्कम रू. 15,00,000/- ची आर्थिक मदत केली जेणेकरून या संकटसमयी आवश्यक त्या सर्व सुविधा लवकर उपलब्ध करता येटील व या बिकट परिस्थितीवर लवकरात लवकर मात करता येईल.

आम्हांस विश्वास आहे की, या संकटसमयी सर्व देशवासी आप-आपसांतील सर्व मतभेद विसरून एक जागरूक व संयमी नागरिक म्हणून देशासोबत खंबीरपणे उभे राहतील व सरकारच्या प्रत्येक सूचनांचे काटेकोरपणे पालन करतील. आपण सर्व या बिकट परिस्थितीचा यशस्वीपणे मुकाबला करून आपल्या देशास लवकरच कोरोनामुक्त करू.

कोठारी ग्रुप व ई.एस.आय.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन 2020

कोठारी ग्रुप व ई.एस.आय.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

राज्य कर्मचारी विमा मंडळाच्या विशेष सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने, कोठारी ग्रुप, सोलापूर व राज्य कर्मचारी विमा निगम तसेच राज्य कर्मचारी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने कोठारी ग्रुपच्या चंद्रमौळी औद्योगिक वसाहती मधील प्रांगणात कोठारी उद्योग समूहातील तसेच आसपासच्या इतर आस्थापनांच्या कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक 5 मार्च 2020 रोजी करण्यात आलेे होते.

राज्य कर्मचारी विमा मंडळाच्या विशेष सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने, कोठारी ग्रुप, सोलापूर व राज्य कर्मचारी विमा निगम तसेच राज्य कर्मचारी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने कोठारी ग्रुपच्या चंद्रमौळी औद्योगिक वसाहती मधील प्रांगणात कोठारी उद्योग समूहातील तसेच आसपासच्या इतर आस्थापनांच्या कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक 5 मार्च 2020 रोजी करण्यात आलेे होते. या आरोग्य शिबिरात राज्य कर्मचारी विमा मंडळातर्फे जवळ-जवळ 16 तज्ञ डॉक्टरांचे पथक व इतर सहाय्यक स्टाफ उपस्थित होते. मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये सर्वसामान्य तपासणी व्यतिरिक्त रक्त तपासणी, रक्तदाब, ई.सि.जी., डोळयांची तपासणी, मणक्यांच्या व हाडांच्या विकारांसाठी अनुभवी अस्थिरोग तज्ञ, तसेच कान, नाक घसा तपासणी सोबतच मोफत औषधांचे वितरण देखील लगेचच संबंधित रूग्णांना करण्यात येत होते. यावेळी आलेल्या प्रत्येक कामगारास हेल्थ पासबुक देण्यात आले.

या आरोग्य शिबिरासाठी राज्य कर्मचारी विमा मंडळ रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. आर. नंदीमठ, वैद्यकीय अधिकारी डॉ. आडारी, डॉ. सुर्वे, डॉ. नीता, डॉ. सुप्रिया, आणि सामाजिक मार्गदर्शक व जनसंपर्क अधिकारी श्री. एम. टि. दराडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री. डांगे, ई.सि.जि. तंत्रज्ञ श्री. कैरमकोंडा, औषधविभाग प्रमुख श्री. भोजणे व सहयोगी स्टाफमध्ये श्रीमती खतकर, श्रीमती नदाफ, श्री. थोरात, श्री. पाटील, श्रीमती मंगल व्हनकौरी, श्री. रवी रावळे, श्री. रंगदळ तसेच राज्य कर्मचारी विमा मंडळ, दमाणी नगर ऑफीसचे शाखा प्रबंधक (प्रभारी) श्री. सुदर्शन पापरकर व त्यांचे सहकारी श्री. जितेंद्र खाणे व श्री. अमरेष कुमार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कोठारी ग्रुपचे चेअरमन श्री. अरविंद कोठारी यांच्या हस्ते आलेल्या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. आलेल्या सर्व रूग्णांसाठी राज्य कर्मचारी विमा मंडळातर्फे अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

सकाळी 11 वाजेपासून सुरू झालेल्या आरोग्य तपासणी शिबिराचा समारोप संध्याकाळी 5 वाजता झाला. यामध्ये कोठारी ग्रुपच्या चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीमधील चार व चिंचोळी औद्योगिक वसाहतीमधील दोन आस्थापनांमधून अंदाजे 450 कामगार व त्यांच्या कुटुंबीयांनी या शिबिराचा लाभ घेतला. तसेच चंद्रमौळी परिसरातील इतर आस्थापनांमधूनसुद्धा काही कामगार बांधवांनी या शिबिराचा लाभ घेतला.